Wednesday 12 October 2016

"झुंज"

मित्रांनो ही कविता आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला भाग पडते की आपण सारेच आजकालच्या भ्रष्टाचार विरुद्ध गपगुमान सारा काही ऐकून घेत असतो.. खरंतर आपल्याला आपली मतं उरलीच नाही अस वाटू लागतं. हाच सारा विचार करून ही  कविता मनात आणि कानात माशी सारखी त्रास देऊ लागली . तीच ही झुंजारून टाकणारी झुंज ही कविता....... 


ही झुंज नवी , ही ओढ नवी
ही सांज नवी ,ही प्रीत जुनी .. 

देऊया लढा या छातीचा , घेऊनि वसा शतजन्मांचा ,
हे तेज उमलत्या जोशाच, हे तेज सुलगत्या राखेचं .. 
निर्भीड उभा या मातीत , घेउनी शपथ त्या ध्यासाची ...... 

झुंजार नवा, ही शपथ जुनी
ही पुकार नवी, ती जिद्द जुनीच ... 

लाढशील आज भरष्ठांशी तू, जुळशील मनमानाशी तू.. 
हे प्रस्त उगवत्या सूर्याचा, हे शस्त्र नव्या धोरणाच... 
मळशील आज या मातीत, गर्व तुझा या मातेस.. 


हा गजर नवा, ती गर्जना जुनी ,
हा पर्व नवा, ती दृष्टी जुनीच.. 
क्षितिजातल्या ताऱ्यातला असा अजब एक तारा तू,
जळशील  तू, देशील साऱ्यास प्रकाश तू...... 

ही झुंज नवी , ही  ओढ नवी
ही सांज नवी , ही प्रीत जुनी ....... 




..... धन्यवाद